नि.नायब तहसीलदार श्री. प्रथमेश मोहोड यांची भवरखेडे घटनेसंदर्भात प्रतिक्रिया
आजचा माझा अनुभव :
२६.०९.२०१९ ला दुपारी ०१.३० वाजताच्या सुमारास विवरे शिवार ता. धरणगाव येथे ४ महिला व १ पुरुष
मृतकांची नांवे
रघुनाथ दशरथ पाटील
वय ६७
अलकाबाई रघुनाथ पाटील
वय ६०
शोभाबाई भागवत पाटील वय५०
कल्पना शामकांत पाटील
वय ३५
लताबाई उदय पाटील
वय ३२
विज पडून जागेवरच मृत्युमुखी पडले.घटनेची सूचना महेंद्र पाटील कोतवाल विवरे यांनी देताच लगेचच वीरेंद्र सोनकांबळे तलाठी विवरे,पी एल बाविस्कर मंडळ अधिकारी धरणगाव यांनी घटनेचा पंचनामा करून आणला. मा.पवन देसले सर सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणगाव यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पंचनामा करून गावकऱ्यांच्या मदतीने मृतांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आणले.विधानसभा निवडणुकीचा ताण असताना सुद्धा २४ तासाच्या आत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पंकज शिंदे लिपिक त.का.धरणगाव यांनी सदर चेक संदर्भात देयक तयार केले.मा.अविनाश ढाकणे सर जिल्हाधिकारी जळगाव यांच्या सूचनेनुसार लगेचच सर्व प्रक्रिया पार पाडून २७.०९.२०१९
दुपारी ०५.०० वाजता मा.विनय गोसावी सर प्रांताधिकारी एरंडोल भाग, एरंडोल व मा. नितीन देवरे सर तहसीलदार धरणगाव यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख अशी एकूण २० लाख रुपयांची शासकीय मदत घरी जाऊन दिली .मृतकांना श्रद्धांजली देण्यात आली .
या प्रसंगी संपूर्ण गावकरी अत्यंत भावुक झाले होते .जरी आकस्मिक मृत्यूनंतर आप्तेष्टांचा अनमोल जीव परत येत नसला तरी सुद्धा शासन कुटुंबीयांच्या खंबीरपणे पाठीशी आहे याची गावकऱ्यांना व समाजाला प्रचिती आली.
यंदाच्या पावसाळ्यातील वीज पडून एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू होण्याची बहुधा ही राज्यातील पहिलीच वेळ असावी .शासनाने केलेल्या आर्थिक मदतीपेक्षा ही त्यामागे असलेला शासनाचा पाठीराखा असल्याचा उद्देश असतो.या उद्देशासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सतत झटत असते .
मला तर अभिमान वाटतो अशा संवेदनशील व प्रगल्भ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांच्या साथीने शासकीय नोकरीमध्ये वाटचाल करताना ....
**मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली**
प्रथमेश मोहोड
निवडणुक नायब तहसीलदार धरणगाव
भवरखेडे ता.धरणगाव येथील मृतांच्या वारसांना मदत
मोजे भवरखेडे ता.धरणगाव येथे वीज पडून मरण पावलेल्या वारसांना शासनातर्फे प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात आली। यावेळी एरंडोल उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, धरणगाव तहसीलदार नितीन देवरे, मंडळ अधिकारी प्रकाश बाविस्कर, तलाठी विरेंद्र सोनकांबळे आदी उपस्थित होते।
यावेळी मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या दुःखद घटनेतून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देवो !💐💐💐
महाराष्ट्र विधानसभा :- २०१९. जिल्हानिहाय तालुका यादी
*महाराष्ट्र विधानसभा :- २०१९*
*जिल्हानिहाय तालुका यादी:-*
*(आरक्षित जागांसह)*
*== नंदुरबार ==*
*1 - अक्कलकुवा (ST)*
*2 - शहादा (ST)*
*3 - नंदुरबार (ST)*
*4 - नवापूर (ST)*
*== धुळे ==*
*5 - साक्री (ST)*
6 - धुळे ग्रामीण
7 - धुळे शहर
8 - शिंदखेडा
*9 - शिरपूर (ST)*
*== जळगांव ==*
*10 - चोपडा (ST)*
11 - रावेर
*12 - भुसावळ (SC)*
13 - जळगांव शहर
14 - जळगांव ग्रामीण
15 - अंमळनेर
16 - एरंडोल
17 - चाळीसगाव
18 - पाचोरा
19 - जामनेर
20 - मुक्ताईनगर
*== बुलढाणा ==*
21 - मलकापूर
22 - बुलढाणा
23 - चिखली
24 - शिंदखेड राजा
*25 - मेहकर (SC)*
26 - खामगाव
27 - जळगाव (जामोद)
*== अकोला ==*
28 - अकोट
29 - बाळापूर
30 - अकोला पश्चिम
31 - अकोला पूर्व
*32 - मूर्तिजापूर (SC)*
*== वाशिम==*
33 - रिसोड
*34 - वाशीम (SC)*
35 - कारंजा
*== अमरावती ==*
36 - धामणगाव रेल्वे
37 - बडनेरा
38 - अमरावती
39 - तिवसा
*40 - दर्यापूर (SC)*
*41 - मेळघाट (ST)*
42 - अचलपूर
43 - मोर्शी
*== वर्धा ==*
44 - आर्वी
45 - देवळी
46 - हिंगणघाट
47 - वर्धा
*== नागपूर ==*
48 - काटोल
49 - सावनेर
50 - हिंगोना
*51 - उमरेड (SC)*
52 - नागपूर दक्षिण-पूर्व
53 - नागपूर दक्षिण
54 - नागपूर पूर्व
55 - नागपूर मध्य
56 - नागपूर पश्चिम
*57 - नागपूर उत्तर (SC)*
58 - कामठी
59 - रामटेक
*== भंडारा ==*
60 - तुमसर
*61 - भंडारा (SC)*
62 - साकोली
*== गोंदिया ==*
*63 - अर्जुनी-मोरगाव (SC)*
64 - तिरोरा
65 - गोंदिया
*66 - आमगाव (ST)*
*== गडचिरोली ==*
*67 - आरमोरी (ST)*
*68 - गडचिरोली (ST)*
*69 - अहेरी (ST)*
*== चंद्रपूर ==*
70 - राजुरा
*71 - चंद्रपूर (SC)*
72 - बल्लारपूर
73 - ब्रम्हपुरी
74 - चिमूर
75 - वारोला
*== यवतमाळ ==*
76 - वणी
*77 - राळेगाव (ST)*
78 - यवतमाळ
79 - दिग्रस
*80 - आर्णी (ST)*
81 - पुसद
*82 - उमरखेड (SC)*
*== नांदेड ==*
83 - किनवट
84 - हदगाव
85 - भोकर
86 - नांदेड उत्तर
87 - नांदेड दक्षिण
88 - लोहा
89 - नायगाव
*90 - देगलूर (SC)*
91 - मुखेड
*== हिंगोली ==*
92 - बसमत
93 - कळमनुरी
94 - हिंगोली
*== परभणी ==*
95 - जिंतूर
96 - परभणी
97 - गंगाखेड
98 - पाथ्री
*== जालना ==*
99 - परतूर
100 - घणसांगवी
101 - जालना
*102 - बदनापूर (SC)*
103 - भोकरदन
*== औरंगाबाद ==*
104 - सिल्लोड
105 - कन्नड
106 - फुलंब्री
107 - औरंगाबाद मध्य
*108-औरंगाबाद पश्चिम (SC)*
109 - औरंगाबाद (पूर्व)
110 - पैठण
111 - गंगापूर
112 - वैजापूर
*== नाशिक ==*
113 - नांदगाव
114 - मालेगाव (मध्य)
115 - मालेगाव (बाह्य)
*116 - बागलाण (ST)*
*117 -कळवण (ST)*
118 - चांदवड
119 - येवला
120 - सिन्नर
121 - निफाड
*122 -दिंडोरी (ST)*
123 - नाशिक पश्चिम
124 - नाशिक मध्य
125 - नाशिक पूर्व
*126 - देवळाली (SC)*
*127 - इगतपुरी (ST)*
*== पालघर ==*
*128 - डहाणू (ST)*
*129 - विक्रमगड (ST)*
*130 - पालघर (ST)*
*131 - बोईसर (ST)*
132 - नालासोपारा
133 - वसई
*== ठाणे ==*
*134 -भिवंडी ग्रामीण (ST)*
*135 - शहापूर (ST)*
136 - भिवंडी पश्चिम
137 - भिवंडी पूर्व
138 - कल्याण पश्चिम
139 - मुरबाड
*140 - अंबरनाथ (SC)*
141 - उल्हासनगर
142 - कल्याण पूर्व
143 - डोंबिवली
144 - कल्याण ग्रामीण
145 - मीरा भाईंदर
146 - ओवाला माजीवडा
147 - कोपरी-पाचपाखडी
148 - ठाणे
149 - मुंब्रा-कळवा
150 - ऐरोली
151 - बेलापूर
*== मुंबई उपनगर ==*
152 - बोरिवली
153 - दहिसर
154 - मागाठाणे
155 - मुलुंड
156 - विक्रोळी
157 - भांडुप पश्चिम
158 - जोगेश्वरी पूर्व
159 - दिंडोशी
160 - कांदिवली पूर्व
161 - चारकोप
162 - मालाड पश्चिम
163 - गोरेगाव
164 - वर्सोवा
165 - अंधेरी पश्चिम
166 - अंधेरी पूर्व
167 - विलेपार्ले
168 - चांदीवली
169 - घाटकोपर पश्चिम
170 - घाटकोपर पूर्व
171 - मानखुर्द शिवाजीनगर
172 - अणुशक्ती नगर
173 - चेंबूर
*174 - कुर्ला (SC)*
175 - कलिना
176 - वांद्रे पुर्व
177 - वांद्रे पश्चिम
*== मुंबई शहर ==*
*178 - धारावी (SC)*
179 - सायन कोळीवाडा
180 - वडाळा
181 - माहीम
182 - वरळी
183 - शिवडी
184 - भायखळा
185 - मलबार हिल
186 - मुंबादेवी
187 - कुलाबा
*== रायगड ==*
188 - पनवेल
189 - कर्जत
190 - उरण
191 - पेण
192 - अलिबाग
193 - श्रीवर्धन
194 - महाड
*== पुणे ==*
195 - जुन्नर
196 - आंबेगाव
197 - खेड आळंदी
198 - शिरूर
199 - दौड
200 - इंदापूर
201 - बारामती
*== पुणे शहर==*
202 - पुरंदर
203 - भोर
204 - मावळ
205 - चिंचवड
*206 - पिंपरी (SC)*
207 - भोसरी
208 - वडगांव शेरी
209 - शिवाजीनगर
210 - कोथरूड
211 - खडकवासला
212 - पर्वती
213 - हडपसर
*214 - पुणे कॅन्टोमेंट (SC)*
215 - कसबा पेठ
*== अहमदनगर ==*
*216 - अकोले (ST)*
217 - संगमनेर
218 - शिर्डी
219 - कोपरगाव
*220 - श्रीरामपूर (SC)*
221 - नेवासा
222 - शेवगाव
223 - राहुरी
224 - पारनेर
225 - अहमदनगर शहर
226 - श्रीगोंदा
227 - कर्जत-जामखेड
*== बीड ==*
228 - गेवराई
229 - माजलगाव
230 - बीड
231 - आष्टी
*232 - केज (SC)*
233 - परळी
*== लातूर ==*
234 - लातूर ग्रामीण
235 - लातूर शहर
236 - अहमदपूर
*237 - उदगीर (SC)*
238 - निलंगा
239 - औसा
*240 -उमरगा (SC)*
241 - तुळजापूर
242 - उस्मानाबाद
243 - परांडा
*== सोलापूर ==*
244 - करमाळा
245 - माढा
246 - बार्शी
*247 - मोहोळ (SC)*
248 - सोलापूर सिटी उत्तर
249 - सोलापूर सिटी मध्य
250 - अक्कलकोट
251 - सोलापूर दक्षिण
252 - पंढरपूर
253 - सांगोला
*254 -माळशिरस (SC)*
*== सातारा ==*
*255 - फलटण (SC)*
256 - वाई
257 - कोरेगाव
258 - माण
259 - कराड उत्तर
260 - कराड दक्षिण
261 - पाटण
262 - सातारा
*== रत्नागिरी ==*
263 - दापोली
264 - गुहागर
265 - चिपळुन
266 - रत्नागिरी
267 - राजापूर
*== सिंधुदुर्ग ==*
268 - कणकवली
269 - कुडाळ
270 - सावंतवाडी
*== कोल्हापूर ==*
271 - चंदगड
272 - राधानगरी
273 - कागल
274 - कोल्हापूर दक्षिण
275 - करवीर
276 - कोल्हापूर उत्तर
277 - शाहूवाडी
278 - *हातकणंगले (SC)*
279 - इचलकरंजी
280 - शिरोळ
*== सांगली ==*
*281 - मिरज(SC)*
282 - सांगली
283 - इस्लामपूर
284 - शिराळा
285 - पलूस-कडेगाव
286 - खानपूर
287 - तासगाव-कवठे महांकाळ
288 - जत
🍁🍁🍁 *(VP)*🍁🍁🍁
पिक पहाणी 2019- 2020
पिक पहाणी 2019/20 संदर्भात आवश्यक सूचना :
पाळधी बु. शिवारातील पिकपहाणी दि.14,15 व 16 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण झालेली आहे. याकामी तलाठी, कोतवाल यांनी प्रत्यक्ष शेत शिवारात जाऊन सद्यस्थितीमधील पिकांची पहाणी केली आहे.
पिकपहाणी करताना काही शेतकऱ्यांनी मोलाची मदत केली. गट, पिक व क्षेत्रनिहाय पिकपहाणी अचुक करण्याचा तलाठी कार्यालयाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यासंदर्भात पिकपहाणीची मुळ यादी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पिकपहाणी संदर्भात आपल्या काही शंका/तक्रारी असल्यास त्या दि.30/09/2019 पर्यंत तलाठी कार्यालयास प्रत्यक्ष भेटून कळवा. पिकपहाणी संगणकावर online झाल्यानंतर मात्र आपल्याला कोणताही बदल करता येत नाही याची सर्व खातेदार शेतकरी बंधुभगिनींनी नोंद घ्यावी.