पिक पहाणी 2019/20 संदर्भात आवश्यक सूचना :
पाळधी बु. शिवारातील पिकपहाणी दि.14,15 व 16 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण झालेली आहे. याकामी तलाठी, कोतवाल यांनी प्रत्यक्ष शेत शिवारात जाऊन सद्यस्थितीमधील पिकांची पहाणी केली आहे.
पिकपहाणी करताना काही शेतकऱ्यांनी मोलाची मदत केली. गट, पिक व क्षेत्रनिहाय पिकपहाणी अचुक करण्याचा तलाठी कार्यालयाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यासंदर्भात पिकपहाणीची मुळ यादी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पिकपहाणी संदर्भात आपल्या काही शंका/तक्रारी असल्यास त्या दि.30/09/2019 पर्यंत तलाठी कार्यालयास प्रत्यक्ष भेटून कळवा. पिकपहाणी संगणकावर online झाल्यानंतर मात्र आपल्याला कोणताही बदल करता येत नाही याची सर्व खातेदार शेतकरी बंधुभगिनींनी नोंद घ्यावी.
Very good,Balu keep it up
ReplyDelete