जिल्हयातील 8 लाख 57 हजार 848 मुलांना गोवर रुबेला लस दिली जाणार
जिल्हयातील 8 लाख 57
हजार 848 मुलांना गोवर रुबेला लस दिली जाणार - मुख्य कार्यकारी
अधिकारी शिवाजी दिवेकर
जळगाव, दि. 22 –
राज्य
शासनाने 9 महिने ते 15 वर्षे वयाच्या
मुलांसाठी गोवर आणि रुबेला आजारावर लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. ही मोहिम 27
नोव्हेंबर पासून जिल्हयात राबविण्यात येईल. या मोहिमे दरम्यान जिल्हयातील 8
लाख 57 हजार 848 मुलांना गोवर
रुबेला लस दिली जाईल असून एकही बालक या लसीकरणापासून वंचित राहणार
नाही अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी आज
दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवर रुबेला
लसीकरण मोहिमेची आढावा बैठक ओयाजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या
बैठकीस अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव
चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. कमलापूरकर, युनिसेफचे
जिल्हा समन्वयक डॉ. प्रकाश नंदापूरकर यावेळी उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर
म्हणाले की, भारत सरकारने सन 2020, साल
पर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट
ठेवले आहे. यासाठी शासनाने टप्प्या टप्याने गोवर रुबेला
ही लस विविध राज्यामधील नियमित लसीकरण कार्यक्रमाध्ये समाविष्ठ करीत आहे. नोव्हेंबर
2018 मध्ये राज्यात गोवर लसीकरण मोहिम आयोजित करण्याचे ठरविण्यात आल आहे.
आपल्या जळगाव जिल्हयामध्ये 9 महिने ते 15
वर्षे वयोगटातील अंदाजित 12 लाख 25 हजार
लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी काही
लाभार्थ्यांना जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल तरी त्यांना हा अतिरिक्त डोस
द्यावयाचा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गोवर रुबेला
मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांनी आपल्या 9 महिने ते 15
वर्षे पर्यतच्या सर्व मुला व मुलींना गोवर रुबेला लसीकरणा करुन दयावा ही लस
पूर्णत: मोफत असणार असल्याचेही डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले.
या बैठकीत आरोग्य विभाग, शिक्षण
विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
मिनी ट्रॅक्टरसाठी स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज करण्याचे आवाहन
मिनी ट्रॅक्टरसाठी स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज करण्याचे आवाहन : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव
जळगाव, दि. 3 - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्ट्रर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी शासकीय अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी बचत गटांनी परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांच्या कार्यालयात जमा करावे. असे आवाहन खुशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
अनुदानाच्या पात्रतेसाठी अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. मिनी ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने मान्यताप्राप्त उत्पादकांकडून प्रथम खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर खातरजमा केल्यावर शासकीय अनुदानाच्या 50 टक्के रक्कम बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल उर्वरित 50 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्ती पेक्षा जास्त अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रु. 3.15लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबधित बचत गटाला स्वत: खर्च करावी लागेल.स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व हे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे. निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यतांना बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे (परिवहन अधिकारी) व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
या अटी व शर्तीमध्ये जे बचत गट पात्र असतील अशा बचत गटांनी नोंदणी प्रमाणपत्र, बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत,गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकांशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत, बचत गटाचे घटनापत्र,बचत गट कार्यकारणी सदस्याची मुळ यादी,सदस्याचा स्वत:चा जातीचा दाखला, को-या कागदावर फोटोसह बचत गटाची ओळख, मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा अंतर्गत आरटीओ नोंदणी आणि स्थानिक जकात (लागू असल्यास) आणि विमा उतरविणेचा खर्च बचत गटांना करावा लागेल. बचत गटाने अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांच्या कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावा व परिपूर्ण अर्ज सादर करावा. अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येतील असे श्री. गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी कळविले आहे.
०००
शिधापत्रिकेसंदर्भातील अर्ज
(कृपया अर्ज सादर करताना रू.२ चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा.)
- नमुना १: नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज
- नमुना 8 : युनिटमध्ये वाढ करणे(नाव वाढविणे)
- नमुना 9 : युनिट कमी करणे(नाव वगळणे)
- नमुना 14 : शिधापत्रिकेमध्ये बदल करणे
- नमुना 15 : शिधापत्रिकेची दुय्यम प्रत मिळणेकरिता अर्ज
राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 2018
राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 2018
शेतमजुरीला सक्षम पर्याय हवाय...
..तर मंडीळी चला जळगावला.. चला..!
26 ते 29 ऑक्टोबरला अॅग्रोवर्ल्डचे कृषी व दुग्ध प्रदर्शन पाहायला...
# शेती व शेतीशी निगडीत इत्यंभूत माहिती मिळणार एकाच छताखाली
# नामांकित कंपन्यांचा सहभाग
शेती अवजारांचे स्वतंत्र दालन.. यंत्र, अवजारे हाताळणी.. प्रात्यक्षिक पहा.. & हाताळा...
शेतमजूर मिळत नाहीत...? मशागतीची कामे खोळंबून आहेत...? फळबागेची छाटणी करायची आहे...? फळबागेच्या आंतरमशागतीसाठी छोटा ट्रॅक्टर हवाय..? नांगरटीसाठी जास्त हॉर्सपॉवरचा दणकट ट्रॅक्टर सुद्धा घ्यायचाय....? मशागतीसाठी छोटी यंत्र घ्यायचीय..? अहो मग एवढा विचार कसला करताय.... जळगाव येथे 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान होणार्या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन अॅग्रोवर्ल्डमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे हमखास मिळतील. होय... शेतमजुरीला सक्षम पर्याय ठरतील, अशी नवनवीन यंत्रे, तंत्रे तसेच नामांकित कंपन्यांचे विविध आकार व प्रकारातील ट्रॅक्टरे, अवजारे, मशिनरी, स्प्रे पंप, फळबाग छाटणीपासून ते परसबागेतील मशागतीच्या कामांसाठी उपयुक्त शेती साहित्ये तसेच स्वतंत्र डेमो एरिया... थोडक्यात ट्रॅक्टर, यंत्र व मशिनरी स्वतः हाताळून खात्री करण्यासाठी प्रदर्शनस्थळी मोठी जागा उपलब्ध... कृषी यंत्र, मशिनरीबाबत उत्तरे मिळविण्याचे एकच ठिकाण जळगाव येथील राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनाची तारीख व ठिकाण विसरू नका. जळगाव... जळगाव... जळगाव... 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान शिवतीर्थ मैदान, जळगाव...
राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 2018 चे प्रायोजक आहेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ... तर सहप्रायोजक आहेत प्लँटो कृषितंत्र, दत्त ड्रीप, दलवाल, सोनालिका ट्रॅक्टर, ग्रब अॅग्रो, न्यू इरा व गोदावरी फाउंडेशन. चार दिवसीय कृषी प्रदर्शनासाठी राज्य सरकारचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जिल्हा परिषद जळगाव, वसुंधरा पाणलोट, आत्मा तसेच इतर शासकीय संस्थांचे सहकार्य आहेच. शासकीय विभागांसाठी स्वतंत्र दालन ठेवण्यात आले आहे. सर्व शासकीय योजनांची माहिती आता एकाच छताखाली मिळण्याचे ठिकाण म्हणजे राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 2018... डोम स्ट्रक्चरमधील या कृषी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्या.. 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान शिवतीर्थ मैदान, जळगाव...