जिल्हयातील 8 लाख 57
हजार 848 मुलांना गोवर रुबेला लस दिली जाणार - मुख्य कार्यकारी
अधिकारी शिवाजी दिवेकर
जळगाव, दि. 22 –
राज्य
शासनाने 9 महिने ते 15 वर्षे वयाच्या
मुलांसाठी गोवर आणि रुबेला आजारावर लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. ही मोहिम 27
नोव्हेंबर पासून जिल्हयात राबविण्यात येईल. या मोहिमे दरम्यान जिल्हयातील 8
लाख 57 हजार 848 मुलांना गोवर
रुबेला लस दिली जाईल असून एकही बालक या लसीकरणापासून वंचित राहणार
नाही अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी आज
दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवर रुबेला
लसीकरण मोहिमेची आढावा बैठक ओयाजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या
बैठकीस अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव
चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. कमलापूरकर, युनिसेफचे
जिल्हा समन्वयक डॉ. प्रकाश नंदापूरकर यावेळी उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर
म्हणाले की, भारत सरकारने सन 2020, साल
पर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट
ठेवले आहे. यासाठी शासनाने टप्प्या टप्याने गोवर रुबेला
ही लस विविध राज्यामधील नियमित लसीकरण कार्यक्रमाध्ये समाविष्ठ करीत आहे. नोव्हेंबर
2018 मध्ये राज्यात गोवर लसीकरण मोहिम आयोजित करण्याचे ठरविण्यात आल आहे.
आपल्या जळगाव जिल्हयामध्ये 9 महिने ते 15
वर्षे वयोगटातील अंदाजित 12 लाख 25 हजार
लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी काही
लाभार्थ्यांना जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल तरी त्यांना हा अतिरिक्त डोस
द्यावयाचा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गोवर रुबेला
मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांनी आपल्या 9 महिने ते 15
वर्षे पर्यतच्या सर्व मुला व मुलींना गोवर रुबेला लसीकरणा करुन दयावा ही लस
पूर्णत: मोफत असणार असल्याचेही डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले.
या बैठकीत आरोग्य विभाग, शिक्षण
विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment