*मतदार नोंदणीसाठी 23 व 24 फेब्रुवारीला विशेष मतदार नोंदणी मोहिम*
जळगाव - आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीत अद्याप मत दार म्हणून नोंदणी केलेली नाही. अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी पुन्हा संधी मिळावी, म्हणून Voter Verification and Information Programme या कार्यक्रमातंर्गत निवडणूक आयोगाने शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक 23.2.2019 व दि 24.2.2019 या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजित करण्यात येत आहे.
या विशेष मोहिमेच्या तारखांना मतदान केंद्रांच्या ठिकाणी BLO मार्फत मतदार नोंदणीचे फॉर्म स्विकारले जातील याची संबंधितांनी नोंद घ्यावी. मतदार नोंदणीच्या विशेष मोहिम कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रीय भाग घेवून निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे. जेणेकरून त्या अचूक व परिपूर्ण होतील व ऐनवेळी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याची तक्रार करण्यास वाव राहणार नाही.