पिक पहाणी 2019- 2020

पिक पहाणी 2019/20 संदर्भात आवश्यक सूचना :

पाळधी बु. शिवारातील पिकपहाणी दि.14,15 व 16 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण झालेली आहे. याकामी तलाठी, कोतवाल यांनी प्रत्यक्ष शेत शिवारात जाऊन सद्यस्थितीमधील पिकांची पहाणी केली आहे.

पिकपहाणी करताना काही शेतकऱ्यांनी मोलाची मदत केली. गट, पिक व क्षेत्रनिहाय पिकपहाणी अचुक करण्याचा तलाठी कार्यालयाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.  यासंदर्भात पिकपहाणीची मुळ यादी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पिकपहाणी संदर्भात आपल्या काही शंका/तक्रारी असल्यास त्या दि.30/09/2019 पर्यंत तलाठी कार्यालयास प्रत्यक्ष भेटून कळवा. पिकपहाणी संगणकावर online झाल्यानंतर मात्र आपल्याला कोणताही बदल करता येत नाही याची सर्व खातेदार शेतकरी बंधुभगिनींनी नोंद घ्यावी.
















Share:

1 comment: